नियम आणि अटी

१) ग्लोबल परळी कडून आपल्याला लागवडीसाठी प्रोत्साहन म्हणून दर्जेदार रोप रास्त दरात देत आहोत तरी शेतकऱ्याने स्वतः नर्सरीला भेट देऊन आणि शहानिशा करून रोप विकत घेणे आवश्यक आहे.भविष्यात रोपांमध्ये कोणतीही समस्या आढळली तर ग्लोबल परळीच्या कोणत्याही व्यक्तीस आपण जबाबदार धरू शकणार नाही.आपण स्वतः नर्सरीशी बोलणे आवश्यक आहे.

 

२) नोंदणी करताना माती परीक्षणाचा रिपोर्ट (ज्या क्षेत्रात लागवड करायची आहे त्या क्षेत्राचा )जमा करणे आवश्यक आहे. त्यामुळे जर माती परीक्षण रिपोर्ट जोडला नसेल तर आपण आपल्या पिकाबद्दल भविष्यात कोणतीही तक्रार ग्लोबल परळी किंवा नर्सरी कडे करण्यास पात्र नाही.

 

३) तुम्ही एकदा ऑर्डर केलेली रोप संख्या किंवा क्षेत्र कमी करू शकत नाही, क्षेत्र वाढ किंवा रोप संख्या वाढ करण्याची परवानगी आहे हि बाब लक्षात घेऊन मगच रोपांचे पैसे भरा.

 

४) तुम्हाला रोप संख्या कमी करायची असल्यास किंवा पैसे भरल्या नंतर एखादे पीक रद्द करायचे असल्यास तुम्ही भरलेली रक्कम एप्रिल २०२१ शिवाय परत मिळणार नाही याची कृपया नोंद घ्यावी

 

५) पपई, शेवगा यापैकी कोणत्याही रोपांचे १००% पैसे भरणे अनिवार्य आहे आणि एकदा ऑर्डर केल्यानंतर जर रोप घेतले नाही तर आपल्याला पैसे परत मिळणार नाही याची नोंद घ्यावी

 

६) ग्लोबल परळी कडून मिळालेल्या रोपांचा तुम्ही केवळ तुमच्या शेतात लागवड करण्यासाठी उपयोग करणे अपेक्षित आहे. त्या व्यतिरिक्त रोपांची परस्पर विक्री किंवा अन्य बाबी करताना आढळ्यास तुम्ही ग्लोबल परळीच्या कायदेशीर कारवाईस पात्र ठराल.

 

७) सलग लागवड साठी किमान क्षेत्र मर्यादा 20 गुंठे असणे आवश्यक आहे.

 

८) बांधावर लागवड साठी किमान 20 व कमाल 100 रोपे तुम्ही घेऊ शकता. पपई रोपे बांधावर लागवड साठी घेता येणार नाहीत.शेवगा बांधावर लागवड साठी घ्यायची असल्यास किमान १२० रोप घेणे बंधनकारक आहे .

 

९) रोपांची पोहोच ही ग्लोबल परळी ने ठरविलेल्या कार्यालयात होईल, तिथून पुढे तुमच्या शेतात रोपे नेण्याची जबाबदारी तुमच्या स्वखर्चाने पार पाडायची आहे.

 

१०) ग्लोबल परळी मार्फत रास्त दरात रोपे मिळतं असली तरी त्यासाठी आम्ही आयोजित केलेली किमान चार प्रशिक्षणा साठी हजर राहणे आवश्यक आहे. जरी तुम्ही रोपांचे 100% पैसे भरले असतील आणि प्रशिक्षण साठी गैरहजर राहिलात तर आम्ही आपणांस रोपे देऊ शकत नाही याची कृपया नोंद घ्यावी.

 

११) रोपांचे पैसे हे केवळ ग्लोबल परळी ने नियुक्त केलेल्या सेवा केंद्रातच भरा आणि त्याची रीतसर पावती घेऊन ती सांभाळून ठेवा. अन्य कोणत्याही व्यक्ती कडे पैसे भरल्यास त्याला ग्लोबल परळी जबाबदार राहणार नाही.

१२) सर्व शेतकऱ्यांनी नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचून संमती पत्रावर सही करावी आणि त्यानंतर आपली ऑर्डर दयावी.