प्रस्तावना

नमस्कार शेतकरी बांधवांनो

आज आम्ही आपल्यासमोर ग्लोबल विकास ट्रस्टच्या विकासात्मक आणि सुखकर असा प्रवास मांडत आहोत.सन २०१६ साली भीषण दुष्काळ होता तेव्हा दीड कोटी लिटर पाणी पुरवठा करण्या पासून ग्लोबल परळी चा प्रवास सुरु झाला. त्या नंतर १५ गावांचा समूह घेऊन सर्वांगीण विकासावर काम करण्यात आले.आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण,जलसंधारण अशा सर्वच शाखात काम करताना नेहमी शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू राहिला.काळानुसार शेतकऱ्याचे जमीन क्षेत्र कमी होत गेले आणि परिणामी उत्पन्न देखील कमी झाले.उपलब्ध जमिनीत चांगले उप्तन्न घेता यावे म्हणून शेतकऱ्याला पर्याय देण्याचा प्रयत्न केला. पारंपरिक पिकाला बगल देऊन नावीन्यपूर्ण पिके घ्याण्यासाठी शेतकऱ्याला प्रवृत्त केले. रेशीम शेती कडे शेतकरी वळवले.

सन २०१९ मध्ये ग्लोबल परळी मार्फत राबविलेल्या “१० लक्ष फळबाग लागवड” कार्यक्रमाच्या भरघोस यशानंतर आम्ही शेतकरी बांधवांच्या सेवेत घेऊन येत आहोत भव्य असा "३० लक्ष फळबाग लागवड" कार्यक्रम. ग्लोबल विकास ट्रस्टच्या फळबाग लागवड या संकल्पनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पनात वाढ करणे व पर्यावरण संवर्धन हे आहे. पारंपरिक शेती सोडून शेतकऱ्याने प्रयोगशील व्हावे आणि एक शाश्वत उत्पन्नाचा पर्याय आत्मसात करावा असा मानस आहे. आणि जितक्या मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होईल तितकेच आपल्या भागात पर्जन्यमान उंचावेल.

टार्गेट २०२० - "३० लक्ष फळबाग लागवड"
जिल्हा तालुका गाव लोकसंख्या
बीड 11 1,357 2,070,751
लातूर 10 928 1,829,216
उस्मानाबाद 8 728 1,376,519
परभणी 9 843 1,259,193
एकूण 38 3,856 6,535,679

कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्य

१) दर्जेदार रोप रास्त दरात उपलब्ध करून देणे :-

पूर्ण भारतातून आपल्या साठी उत्तम आणि दर्जेदार रोप उपलब्ध करणे, मातृवृक्षा पासून कलम केलीली उत्तम रोपे आपल्या पर्यंत पोहोचवणे हे आमचे नैतिक कर्तव्य आहे. आपल्याला ९ प्रकारची फळझाडे ग्लोबल परळी मार्फत देण्यात येतील.ज्या नर्सरीतून रोप पुरवठा होणार आहे त्या नर्सरीचा पत्ता आपल्याला दिला जाईल, तुम्ही स्वतः जाऊन रोपांची शहानिशा करू शकता. खाली रोपांची किंमत व जात तक्ता दिला आहे.

अनु. क्र. फळपीक जात "१० मे च्या अगोदर बुकिंग केल्यास दर (प्रति रोप)" "१० मे च्या नंतर बुकिंग केल्यास दर (प्रति रोप)"
1 शेवगा सिध्दीविनायक मोरिंगा
2 पपई तैवान ७८६ ११
3 लिंबोणी साई सरबती १० १०
4 संत्र नागपुरी ३० ३०
5 मोसंबी न्यू शेलार - रंगपूर खुंटावरील ३० ३५
6 आंबा केसर ३० ३०
7 पेरू एल ४९ २० २५
8 सीताफळ एन. एम. के. १ ३८ ४९
9 नारळ आसारामपट्टी ३५ ३५

२) प्रशिक्षण :-

आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली म्हण "शिकेल तो टिकेल" हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही चालतो. फळबाग लागवड करायची म्हणजे एकदा लागवड केल्यावर पुढील २० ते २५ वर्ष आपल्याला उत्पन्न घ्यायचे आहे. आणि अशात लागवड अंतर , पद्धत आणि तंत्र या बाबी फार महत्वाच्या आहेत. ग्लोबल परळी मार्फत लागवड पूर्व , लागवड दरम्यान आणि लागवड पश्चात प्रशिक्षण देण्यात येईल. दर्जेदार प्रशिक्षण आणि प्रशिक्षक आपल्या पर्यंत घेऊन येणे हे आमचे काम राहील. जे शेतकरी किमान चार प्रशिक्षण साठी हजर राहतील त्यांनाच रोप पुरवठा केला जाईल.

३) बाजारपेठ आणि प्रकिया उद्योगात सहकार्य :-

माल आल्यावर तो कसा आणि कुठे विकायचा या भीती पोटी शेतकरी फळबाग लावण्यास धजत नाही. ग्लोबल परळी मार्फत मोठ्या प्रमाणात लागवड होत असल्यामुळे बाजारपेठ आपल्या बांधावर घेऊन येणे शक्य आहे. बाजरपेठ कशी शोधावी, प्रक्रिया उद्योगाकडे प्रवास कसा करावा या बाबत मार्गदर्शन व सहकार्य केले जाईल.

टीप :-

१) शेतकऱ्यांना दोंन टप्प्यात रोपांचे पैसे भरण्याची मुभा आहे.प्रथम नोंदणी १० मे २०२० पर्यंत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्याला रोपांची किंमत कमी असेल मात्र १० मे नंतर रोपांची वाढीव किंमत भरावी लागेल. दिनांक ३० मे पर्यन्त रोपांची ५०% रक्कम भरून आपल्याला नोंदणी करणे आवश्यक आहे . व दुसरा टप्पा म्हणजेच उर्वरित १००% रक्कम १० जून २०२० पर्यन्त भरणे आवश्यक आहे.

२) आपल्या सोयीसाठी आपल्या तालुक्यातील आम्ही निवडलेल्या सेवा केंद्रात (यादी सोबत दिली आहे ) नोंदणी ची मोफत सोय केलेली आहे. दोन टप्प्यात पैसे भरणे किंवा रोप संख्या व क्षेत्र वाढवणे या बाबीसाठी आपल्या कडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र या पेक्षा जास्त बदल करण्यासाठी तुम्ही सेवा केंद्रात गेलात तर तुम्हाला २५ रुपये द्यावे लागतील .

कोणत्याही शेतकऱ्याची प्रथम नोंदणी हि सी एस सी मार्फतच होईल.