नोंदणी कशी करावी ?

ग्लोबल परळी च्या प्रतिनिधींशी संपर्क साधून प्रथम सर्व माहिती मिळवा. ग्लोबल परळी च्या वेबसाईट वर सर्व माहिती सविस्तर दिली आहे . आपल्याला कोणते फळपीक घ्यायचे आहे याचा नीट विचार करा. किती अंतरावर लागवड करायची हे देखील ठरवून घ्या .

वेबसाईट वर किंमत कॅल्क्युलेटर दिला आहे त्यात आपला किती खर्च होणार आहे याचा नीट अभ्यास करा

एकदा आपला नोंदणी करण्याचा निर्णय पक्का झाला कि आपल्या जवळच्या ग्लोबल परळी ने निवडलेल्या सी एस सी केंद्रात जाऊन नोंदणी करा .

नोंदणी करताना खालील कागदपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक आहे

  1. सात बारा - अनिवार्य
  2. आठ अ - अनिवार्य
  3. आधार कार्ड - अनिवार्य
  4. पॅन कार्ड (जर तुमची रोपांची रक्कम ५०००० पेक्षा जास्त असेल तरच पॅन कार्ड आवश्यक आहे)
  5. माती परीक्षण रिपोर्ट.(माती परीक्षण रिपोर्ट सादर करणे उत्तम राहील कारण हा रिपोर्ट नसेल तर आपण भविष्यात कोणतीही तक्रार करू शकत नाही )
  6. नोंदणी करण्यासाठी सेवा केंद्रात गेल्यावर जी व्यक्ती प्रकल्पाच्या संपर्कात राहणार आहे त्यांचा संपर्क क्रमांक देणे अत्यावश्यक आहे कारण कार्यक्रमाची माहिती,प्रशिक्षण तारीख,रोप वाटप नियोजन आणि इतर सर्व बाबी त्या व्यक्तीला त्याच्या संपर्कावर दिल्या जातील.
  7. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी रोपांची रक्कम २ टप्प्यात भरण्याची व्यवस्था केलेली आहे. टप्पा १ मध्ये जेव्हा तुम्ही नोंदणी करण्यासाठी सेवा केंद्रात याल तेव्हा तुमची नोंदणी करून तुमच्या रोप मागणीनुसार रोपांची किमान ५० टक्के रक्कम घेतली जाईल.व टप्पा २ मध्ये उर्वरित पूर्ण रक्कम घेतली जाईल.
  8. टप्पा १ आणि २ मध्ये दिलेली रोपांची मागणी व पैसे भरणे यासाठी आपल्याला सेवाकेंद्रामार्फत कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही ते शुल्क ग्लोबल विकास ट्रस्ट मार्फत सेवाकेंद्राला दिले जाईल. परंतु २ वेळेपेक्षा जास्त कोणताही बदल करायचा झाल्यास तुम्हाला सेवाकेंद्राला २५ रुपये शुल्क द्यावा लागेल.
  9. ग्लोबल विकास ट्रस्ट ने सुचवलेल्या सेवाकेंद्राशिवाय इतर कुठेही रोपांचे पैसे भरू नये. सेवाकेंद्रात पैसे भरल्यास त्याची रीतसर पावती घेणे आवश्यक आहे. रोप वाटप करताना ती पावती पाहूनच आपल्याला रोप दिले जाईल.
  10. तुम्ही सेवाकेंद्रात रोपांचे पैसे भरल्यास सेवाकेंद्रा मार्फत ते ग्लोबल विकास ट्रस्टच्या खात्यावर टाकण्यात येतील. रक्कम जमा झाल्यास तुम्ही नोंदणी वेळेस दिलेल्या संपर्क क्रमांकावर तुम्हाला संदेश येईल.